मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 13 ऑगस्ट 2023 (14:14 IST)

Gautami Patil : एकाच मंचावर गौतमी पाटील आणि अभिनेत्री माधुरी

gautmi patil
social media
गौतमी vs माधुरी पवार : महाराष्टातील प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील आणि अभिनेत्री माधुरी पवार यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहे. गौतमी नृत्याच्या नावाखाली अश्लील डान्स करण्याची टीका अभिनेत्री माधुरी पवार हिने केली होती. हा वाद दोघांपुरते नसून नंतर चिघळला आणि दोघींच्या चाहत्यांनी एकमेकांना ट्रोल केले. 

पण आता दोघींमधील वाद नाहीसा झाल्याचे अलीकडेच दिसले. या दोघी हडपसर येथील 'टिऑस कॅफे च्या ग्रँड ओपनिंग कार्यक्रमात एकाच मंचावर एकत्र दिसल्या. एवढेच नाही तर दोघींनी एकमेकींना फ्रेंडशिप बँड देखील बांधला. 
 
या नंतर त्यांचे डान्सचे परफॉर्मन्स देखील झाले. माधुरी पवार लावणी डान्ससाठी प्रसिद्ध आहे. ती झी युवाचे प्रसिद्ध शो अप्सरा आली या डान्स शोची विजेती आहे. ती आपल्या नृत्यातून महाराष्ट्राची लोककला लावणी नृत्याच्या माध्यमातून जपण्याचे काम करते. तिचा चाहत्यांच्या वर्ग जास्त आहे. तर गौतमी पाटील ही डीजेवर नृत्य करते. तिच्या कार्यक्रमात नेहमीच गोंधळ होतो. ती आपल्या नृत्यामुळे नेहमीच वादात असते. या वेळी नेहमी गौतमी पाटीलच्या विरोधात असणारे घनश्याम दराडे देखील मंचावर दिसले. 
 


Edited by - Priya Dixit