Jhimma : एका दिवसात एका चित्रपटगृहात झिम्माचे १८ खेळ हाऊसफुल्ल!

zimma
Last Modified बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (16:15 IST)
प्रेक्षकांच्या प्रतिक्षेला विराम देत १९ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात 'झिम्मा' प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचे सर्व शोज हाऊसफुल्ल जात आहेत. विकएंडला संपूर्ण महाराष्ट्रात सर्व चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले होते तर 'झिम्मा'चे प्री बुकिंगही जोरदार सुरु आहे. विशेष म्हणजे विकएंडला ठाण्यातील एका मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे १८ शोज लागले होते आणि तेसुद्धा सगळे हाऊसफुल्ल. प्रेक्षकांबरोबरच पत्रकारांकडूनही या चित्रपटाचे प्रचंड कौतुक होत असून वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल्स, सिनेसृष्टीकडूनही 'झिम्मा'ला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'झिम्मा' चित्रपटाला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '' सर्वप्रथम 'झिम्मा'ला मिळत असणाऱ्या प्रेमाबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांच्या या पाठिंब्यामुळे एक प्रकारचे बळ मिळाले आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी चित्रपटसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. विशेष म्हणजे शासनाच्या नियमांनुसार पन्नास टक्के सीट्सची परवानगी असूनही कोरोनाबद्दलच्या भीतीवर मात करत, प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येऊन चित्रपटाचा आनंद घेत आहेत.’’


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Jersey First Song Released: शाहिद कपूरचे 'जर्सी' गाणे ...

Jersey First Song Released: शाहिद   कपूरचे 'जर्सी' गाणे 'मेहरम' रिलीज, चाहते म्हणाले - 'ब्लॉकबस्टर...'
जर्सी फर्स्ट गाणे रिलीज: शाहिद कपूरचे चाहते त्याच्या पुढच्या 'जर्सी' चित्रपटाच्या रिलीजची ...

मिर्झापूरच्या या कलाकाराचा मृतदेह तीन दिवसांपासून घराच्या ...

मिर्झापूरच्या या कलाकाराचा मृतदेह तीन दिवसांपासून घराच्या बाथरूममध्ये पडून होता
मुंबई- 'मिर्झापूर' या लोकप्रिय वेबसीरिजमध्ये मुन्ना भैय्याच्या मित्र ललितची भूमिका करणारा ...

मराठी अभिनेत्रीकडून प्रोडक्शन कंट्रोलरने शरीरसुखाची मागणी ...

मराठी अभिनेत्रीकडून प्रोडक्शन कंट्रोलरने शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप
स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेची चर्चा एका वेगळ्या कारणामुळे होत ...

हिमाचलमध्ये 'गदर 2'चे शूटिंग सुरु, सनी देओल आणि अमिषा पटेल ...

हिमाचलमध्ये 'गदर 2'चे शूटिंग सुरु, सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यावर चित्रित करण्यात आले दृश्य
भारत-पाक फाळणीवर बनलेल्या 'गदर' या सुपरहिट चित्रपटानंतर आता त्याचा दुसरा भागही बनणार आहे. ...

Bali Official Trailer थरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर 'बळी'; ...

Bali Official Trailer थरकाप उडवणारा हॉरर थ्रिलर 'बळी'; प्रदर्शित होत आहे ९ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर
अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज मराठी हॉरर थ्रिलर चित्रपट ‘बळी'च्‍या जागतिक रीलीजची घोषणा ...