1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (10:45 IST)

Jimma 2 : ‘झिम्मा 2’ चा चित्रपटगृहात धुमाकूळ,केली कोट्यवधींची कमाई

Zimma 2
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. 24 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे. ‘झिम्मा 2’ने 4.77 कोटींचा गल्ला जमवला असून या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘’प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम सुखावणारे आहे. आम्ही अनेक थिएटर्सना भेट देत आहोत खूप ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया भारावणाऱ्या आहेत. हा भाग आधीच्या भागापेक्षा अधिक चांगला असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत.

प्रेक्षक आवर्जून भेटायला येत असून सोशल मीडियावरही अनेकांचे संदेश येत आहेत. प्रेक्षकांकडून ‘झिम्मा 2’वर होणारा कौतुकाचा वर्षाव भारी फिलिंग देणारा आहे. कलर यल्लो प्रॅाडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मराठी कलाकारांसोबत समीक्षक देखील या चित्रपटाचे कौतुक करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
4 crores of Zimma 2 in the first three days, झिम्मा 2,marathi movie, manoranjan news