गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 20 सप्टेंबर 2023 (12:33 IST)

पिंकीचा विजय असो फेम अभिनेत्री शरयूचा गुपचूप साखरपुडा

sharyu sonavane pinky
Photo- Instagram
स्टार प्रवाहाची मालिका पिंकीचा विजय असो फेम अभिनेत्री शरयू सोनावणे हिने गुपचूप साखरपुडा उरकून घेतला आहे. पिंकीचा विजय असो या मालिकेतून शरयूला ओळख मिळाली. पण काही दिवसांपूर्वी हिने मालिकेला अचानक सोडल्यामुळे प्रेक्षकांना धक्काच बसला. आता या अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा करून पुन्हा धक्का दिला आहे. तिने साखरपुडा केल्याची माहिती सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली. तिने साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिले की ''आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देणार असं मी ठरवलं. हॅपी अँड एंगेज .गणपती बाप्पा मोरया.'' 
 
अभिनेत्रींने शेअर केलेले फोटो पाहून चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit