Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

क्षिती जोग साकारणार नवी भूमिका

Updated: गुरूवार, 18 मार्च 2021 (14:45 IST)
 
निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासह सिद्धार्थ चांदेकरची भूमिका असलेला 'झिम्मा' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी सर्वांना उत्सुकता होती. टिझरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रेक्षकांनीच नाही तर अनेक हिंदी-मराठी कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे ‘झिम्मा’च्या निमित्ताने हेमंत आणि क्षितीची ही ऑफस्क्रीन जोडी पहिल्यांदाच दिग्दर्शक -अभिनेत्री म्हणून एकत्र काम करणार आहे.
 
आपल्या निर्मिती क्षेत्रातील नवीन प्रवासाबद्दल क्षिती सांगते, ''खरं सांगायचं तर निर्मिती क्षेत्रात येताना आपल्या जवळचा आपला फेवरेट विषय घेऊन यायचं असं ठरलं होतं आणि झिम्मा ने ती संधी दिली! ज्या पद्धतीचे चित्रपट आपल्याला बघायला आवडतात तसे चित्रपट आपण बनवायचे हे मी पक्क ठरवलं होतं! आता झिम्मा तयार झाल्यावर आपल्या मनासारखं घडल्याचा आनंद आहे! समाधान आहे. प्रवास आणि चित्रीकरणाच्या निमित्ताने झालेला आमच्या सात जणींचा प्रवास खरोखर खूपच रंजक होता. या निमित्ताने मला माझ्या मैत्रिणींसोबत काम करता आले. हेमंतचं दिग्दर्शन जवळुन बघता आलं. पुन्हा प्रेमात पडता आलं. निर्मिती ताई, सुहास ताई यांच्या सहवासातून बरंच काही शिकण्याची संधी मिळाली. खूप मजा आली. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, या गोष्टीचा विशेष आनंद आहे. हा चित्रपटात महिला असल्या तरीही प्रत्येक पुरुषाने हा चित्रपट आवर्जून बघावा असाच आहे.''
 
आज वर्षभराने इतकी मोठी स्टारकास्ट असलेला आणि धमाल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि क्रेझी फ्यू फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. तर इरावती कर्णिक लिखित या चित्रपटाची निर्मिती क्षितीसह स्वाती खोपकर, अजिंक्य धमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपाम मिश्रा यांनीही केली आहे. अमितराज यांचे या चित्रपटाला संगीत लाभले असून संजय मेमाणे यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पहिले आहे.

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

सर्व पहा

प्रसिद्ध गुजराती संगीतकार गौरांग व्यास यांचे निधन; १०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले

Bigg Boss 20 सलमान खानच्या शोमध्ये कौटुंबिक नाट्य पाहायला मिळणार? आमिर खानचा भाऊ फैसल खानच्या एन्ट्रीची चर्चा

जन्माष्टमी असो वा विकेंड; मन प्रसन्न करण्यासाठी महाराष्ट्रातील 'या' इस्कॉन मंदिरांना नक्की भेट द्या!

पद्मावत'मधील 'जौहर' दृश्यावर स्वरा भास्करच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण, अभिनेत्री ने दिले स्पष्टीकरण

VIBE मूव्ही प्रीव्ह्यू: कुणाल खेमू आणि प्रीती झिंटा यांची ॲक्शन-कॉमेडी

पुढील लेख
Show comments