मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (15:52 IST)

लॉकडाउन नंतर पहिले नवं मराठी नाटक "लोक-शास्त्र सावित्री" आता ठाण्यात !!

लॉकडाऊन नंतर मराठी रंगभूमीवरील पहिले मराठी नाटक रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांचे "लोक-शास्त्र सावित्री" !!
 
3 जानेवारी 2021 क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बदलापूर पासून सुरू झालेला हा नाट्य जागर रायगड जिल्हातील आदिवासी पाड्यातून व गाव खेड्यातून प्रस्तुत झाले. वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल नंतर आता ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संपन्न होणार आहे. 
 
"थिएटर ऑफ रेलेवन्स" चे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित "लोक-शास्त्र सावित्री" या नाटकाचा प्रयोग विश्व रंगमंचा दिनानिमित्त 27 मार्च 2021 शनिवार रोजी, गडकरी रंगायतन ठाणे येथे सकाळी 11.30 प्रस्तुत होणार आहे. 
 
सावित्रीबाई फुलेंनी महाराष्ट्रातील पुरोगामित्वाचा नवा पाया रचला होता. आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला होता.त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात अजूनही धगधगते का ? 
 
लोक-शास्त्र सावित्री या नाटकाच्या माध्यमातून प्रत्येक जनमानसात सावित्रीची म्हणजेच विवेकशील माणूस म्हणून जगण्याची मशाल पेटावी. या हेतूने नाटक सादर होत आहे.