शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 मार्च 2021 (13:07 IST)

पुण्यात आज रात्रीपासून कडक निर्बंध

पुणे- पुण्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी बघत लॉकडाऊन लागू करण्यात आला नसून कडक निर्बंध आणले जाणार आहेत. शुक्रवारी 12 मार्च 2021 म्हणजेच आज रात्रीपासून हे कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत.
 
पुण्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक अधिक प्रमाण आढळून येत असल्यामुळे काही कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती देत नागरिकांनी कोविडच्या नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे.
 
विभागीय आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. मात्र दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली आहे. याशिवाय सर्वेक्षण आणि कॉन्टेक्ट ट्रेसिंग देखील सुरू करण्यात येणार आहेत. 
 
हे असतील निर्बंध 
हॉटेल्स आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजता बंद करण्यात येतील. 
येथे क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच सेवा देता येईल.
याठिकाणाहून पार्सल सेवा 11 पर्यंत सुरू राहणार आहे.