सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (21:56 IST)

पुण्यातील एकदिवसीय मालिका प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पुण्यातील एकदिवसीय मालिका प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार आहे. याबाबतची परवानगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकटकर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे गवर्निंग काऊंसिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. 
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परस्थितीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २३ मार्चपासून पुण्यात होत आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे जमाव जमवण्यावर कडक निर्बंध लागू करण्याची प्रक्रिया टप्प्या टप्प्याने सुरु केली आहे. त्यातच बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत मैदानाच्या क्षेमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली होती. पण, मुख्यमंत्र्यांनी प्रेक्षकांविना राज्यात सामने खेळवण्यास परवानगी दिली आहे.