गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 21 मार्च 2018 (11:06 IST)

बिग बॉस शो मराठीत चर्चा तर होणारच, प्रोमो जाहीर महेश मांजरेकर होस्ट

mahesh manjarekar in big boss

हिंदी मध्ये सलमान खान सोबत बिग बॉस जोरदार हिट आहे. त्यामुळे आता तो मराठीत सुद्धा येतो आहे. मग मराठीचा बिग बॉस कोण होणार हे आता संपले असून जेष्ठ कलाकार महेश मांजरेकर हे हा शो होस्ट करणार आहेत. यासाठी अधिकृत प्रोमो जाहीर झाला आहे.  मराठी सिनेसृष्टीत ज्यांचा दबदबा आहे असे निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर हा मराठी बिग बॉस होस्ट करताना दिसणार आहे. या शोचा प्रोमो नुकताच लाँच झाला आहे.  हिंदीतील बिग बॉस होस्ट सलमान खान सगळ्यांचा चाहता होता. आता महेश मांजरेकरांना देखील तेवढीच किंवा त्याहून अधिक लोकप्रियता मिळते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या अगोदर बिग बॉस रितेश देशमुख होस्ट करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्याजागी महेश मांजेरकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे आता हा बिग बॉस किती बोल्ड होतो ..यामध्ये कोणकोण सहभागी होतात...काय नाट्य घडते कश्या प्रकारे यामध्ये लोक सहभागी होतात...यामध्ये सेलिब्रिटी सोबत इतर क्षेत्रातील लोक कसे सामील होतात..याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.