बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 12 जानेवारी 2021 (22:32 IST)

मकर संक्रांती २०२१: तेजश्री प्रधान, अनिता दाते, गौतमी देशपांडे यांचे सौंदर्य खुलवणाऱ्या काळ्या साड्यांनी सर्वांनाच केले प्रेरित

मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर, आपल्या अलमारीमध्ये जागा मिळण्यास पात्र असलेल्या काही ट्रेंडीएस्ट आणि सुंदर अशा काळ्या साड्यांवर टाकूयात एक नजर
 
खासकरून अनपेक्षित अशा 2020 नंतर सुरु झालेल्या नवीन वर्षाचा उत्साह अजून मावळला नसला तरीही येणाऱ्या उत्सवांच्या आगमनाने आपल्या सर्वांनाच अधिक उत्साही केले आहे. मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला सण आहे आणि म्हणूनच याची तयारी आधीपासूनच जोरात सुरू झाली आहे. हा उत्सव संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक विधींनी साजरा केला जात असला, तरी विशेषत: महाराष्ट्रात काळे कपडे परिधान करण्याची परंपरा पाळली जाते. या सणाच्या काळात आपल्या लाडक्या झी मराठी नायिकांकडून सर्वोत्तम परीधानासाठी काही प्रेरणा आपल्याला नक्कीच मिळू शकेल.  
 
तर, या उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर, आपल्या कपाटात जागा मिळवण्यास नक्कीच पात्र असलेल्या काही ट्रेंडीएस्ट परंतु साध्या काळ्या साडींवर नजर टाकूयात. इथे पहा:
 
अनिता दातेची प्लेन ब्लॅक गोल्डन साडी
तुम्ही अगदी साधे राहू इच्छित आहात आणि तरीही आपल्या पोशाखात सर्वांना आकर्षित करू इच्छित आहात? तर मग अनिता दातेचा हा काळ्या रंगाच्या साडीवर गोल्डन ब्लाउज लूक आपल्यासाठी एक योग्य पर्याय असेल. एक साधी केशरचना, साधी साडी, फार चमकदार नसलेला गोल्डन ब्लाउज आणि नाजूक दागिने आपल्याला या मकर संक्रांतीच्या निवडीसाठी स्वस्त आणि आकर्षक लूक प्रदान करतील.
 
गौतमी देशपांडेचा मोहक काळा लूक
पारंपारिक साजेला थोडेसे हटके वळण देत, गौतमी देशपांडेचा लूक मकर संक्रांतीसाठी एक मोहक पोशाख सादर करतो. साजेशा दागिन्यांसह निळ्या नक्षीची काळी साडी ही नक्कीच एक उत्तम निवड ठरेल.
 
निवेदिता सराफ यांचा रिच आणि ऑथेंटिक लुक
क्रिस्टल काळ्या मण्यांचा हार परिधान केलेल्या निवेदिता सराफ यांची नारिंगी किनार असलेली काळी साडी कोणत्याही सणाच्या हंगामात एक श्रीमंत आणि अस्सल रूप म्हणून शोभून दिसेल. या मध्ये त्यांनी घातलेल्या सोन्याच्या बांगड्या या लूकच्या सौंदर्यात अधिक भर घालते.  
 
तेजश्री प्रधानचा ब्राइट लुक
तेजश्री प्रधानने परिधान केलेली काळ्या प्रिंटची साडी या उत्सवी वातावरणात तुम्हाला छान आणि चमकदार ठेवेल.  दोन हलक्याशा दागिन्यांसह परिधान करण्यात आलेली ही साधीशी साडी आपल्या लूकमध्ये आणखी उन्नती करेल.
 
अन्विता फलटणकरचा क्लासी लूक
अवजड डिझाईन्स किंवा प्रिंट्स नसल्यामुळे अन्विता फलटणकरची साधी काळी साडी तुमचे लक्ष सहज वेधून घेते. गोल्डन शेड्स असलेली प्लेन ब्लॅक साडी पारंपारिक आणि कॅज्युअल लुकचे परिपूर्ण मिश्रण असल्याचे दिसते.
 
तर, अशी ही न संपणारी यादी आहे, आपल्या लाडक्या झी मराठी नायिकांची ज्यांनी मकर संक्रांतीसाठी खास काळ्या रंगांच्या मोहक साड्या परिधान करून आपले सौंदर्य खुलवले आहे.
 
अधिक मनोरंजक कंटेंट आणि कथांसाठी जोडून घ्या झी5 सोबत आपल्या आवडत्या टीव्ही शोचे ताज्या मालिकेचे भाग  टीव्हीवरील प्रसारणाच्या एक दिवस आधी फक्त झी 5 क्लबवर पाहता येतील.