1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. Marathi Stars accepted InstaChannel

मराठी स्टार्सनी स्वीकारले इन्स्टा चँलेंज

अल्पावधीतच लाखो लोकांपर्यंत पोहोचणा-या सोशल नेटवर्किंग साइटवर एखादी नवीन गोष्ट आली, की लागलीच त्याचा ट्रेंड बनतो!
असाच एक ट्रेंड इंस्टाग्रामवर सध्या मोठ्या प्रमाणात चालत आहे.
हॅशटॅग च्या इन्स्टा जगात #tenyearchallange ने नेटक-यांना अक्षरशः खूळ लावले आहे, यात आपल्या दहा वर्षापूर्वीचे आणि सध्याचे फोटो एका फ्रेममध्ये लावले जातात.
विशेष म्हणजे बॉलीवूडनेही या नव्या हॅशटॅगचे स्वागत केले असून, मराठी कलाकारांनी देखील #tenyearchallange स्वीकारले आहे.
ज्यात अमेय वाघ, सुयश टिळक यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांचा तर अभिनेत्री अमृता खानविलकर, इशा केसकर, रूपाली भोसले यांसारख्या कैक मराठी तारकांचा समावेश आहे.
पुढील लेख
'भाई व्यक्ती कि वल्ली-उत्तरार्ध' ट्रेलर