सोमवार, 2 ऑक्टोबर 2023
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 29 एप्रिल 2021 (12:37 IST)

कोरोनाला आळा घालण्यासाठी मराठमोळ कलाकारांनी कसली कंबर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशामध्ये पुन्हा लॉकडाउन लावण्याची वेळ आली आहे. नेमके राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन' मोहिेमेंतर्गत नियम व अटी लागू करून फक्त अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अशातच अनेक मराठमोळ कलाकारांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आता कंबर कसली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्लाझ्मा दानासाठी आवाहन केलं आहे. स्त्रियांमध्ये HB कमी असल्यामुळे आणि बाळंतीण झाल्यानंतर प्लाझ्मा दान करता येत नाही म्हणून इतर महिलांनी ही अवश्य पुढे यावं, अशी विनंती सोनालीने सगळंना केली आहे.
 
सोनाली व्यतिरिक्त स्वप्निल जोशी यानेसुद्धा आपले सर्व अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही दिवसांसाठी फक्त कोरोनासंबंधित गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे घोषित केलं आहे. यावर फक्त लोकांच्या मदतीसाठी तसेच जागरूकतेसाठी काही पोस्ट करण्यात येणार आहे. त्याच्या व्यक्तीगत किंवा मनोरंजन क्षेत्राशी निगडित कोणत्याही प्रकारच्या घडामोडी तो यादरम्यान पोस्ट करणार नाही अशी माहिती स्वप्निलने दिली आहे. तसेच स्वप्निलने यात प्रत्येकाला सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे.