गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जून 2019 (11:23 IST)

नचिकेतला वाटतो नेहाचा अभिमान

Nachiket seems proud of Neha
बिगबॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा बोलबाला मोठ्या प्रमाणात होत आहे. १०० दिवस चालणा-या या शोला ३० दिवस पुर्ण होत असून, या कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. टास्क आणि नाॅमिनेशनच्या या चुरसपुर्ण स्पर्धेमध्ये स्पर्धकांच्या मानसिकतेचा आणि बुद्धीकौशल्याचा कस लागतो आहे. ज्यात 'नेहा शितोळे' ही स्पर्धक सर्वांमध्ये वरचढ ठरत असलेली आपल्याला पहायला मिळते आहे. बिगबॉस मराठीच्या घरातील टास्कदरम्यानची लढवय्या नेहा लोकांना आवडत आहे. तिच्यातल्या यी खेळाडूवृत्तीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत असून, तिचा पती नचिकेतला देखील तिचा सार्थ अभिमान वाटतो. "नेहा माझी बायको आहे म्हणून नव्हे तर तिच्यातल्या लढवय्या मुलीचा मला अभिमान वाटतो. घरात चाललेल्या कोणत्याही राजकारणात न पडता तिने आपला संपूर्ण फोकस केवळ खेळावर ठेवला आहे, याचं मला कौतुक वाटतं". असे नचिकेत नेहा बद्दल सांगतो.
नुकत्याच झालेल्या विकेंड चा डाव मध्ये महेश मांजरेकर यांनी नेहाची प्रशंसा देखील केली, तसेच 'स्टार आॅफ दि वीक' चा किताबही तिला बहाल केला. यात सोने पे सुहागा म्हणजे गेल्या आठवड्यात घराबाहेर गेलेल्या विद्याधर जोशी ऊर्फ बाप्पाला मिळालेल्या विशेष अधिका-याद्वारे त्याने नेहाला या आठवड्यात सेफ करत वाढदिवसाची भेट तिला देऊ केली. त्यामुळे पहिल्यांदाच आपल्या कुंटुबियांपासून दूर बिगबॉसच्या घरात सध्या ती स्वतःचा वाढदिवस साजरा करत आहे.