रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (16:24 IST)

'बाबू'मध्ये नेहा महाजनची एंट्री

अंकित मोहनची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'बाबू' या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या एकदम जोमात सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच अंकितचे ऍक्शन सीन्स व्हायरल झाले होते. ऍक्शनचा धमाका असणाऱ्या या चित्रपटात आता नेहा महाजनची एंट्री झाली आहे. मराठी, हिंदी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली नेहा महाजन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या तिचा या चित्रपटातील लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात तिने लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. त्यामुळे नेहाचा हा एकंदर पेहराव बघून या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमधील उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. आता नेहाची भूमिका काय आहे, हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे हे असून निर्माता बाबू के. भोईर हे आहेत. श्री कृपा प्रोडक्शन निर्मित 'बाबू' या चित्रपटात अंकित मोहन, नेहा महाजन यांच्यासोबत रुचिरा जाधवही दिसणार आहे.