शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 28 जून 2023 (11:55 IST)

52 व्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या बद्दल जाणून घेऊ या त्यांच्या कथांचा रोमांचक प्रवास ....

भारतीय चित्रपसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या दिग्दर्शनाचा अनोखा प्रवास ! 
लाईट , कॅमेरा आणि अँक्शन्  या तीन शब्दा मध्ये ज्यांच आयुष्य घडल ते म्हणजे प्रख्यात चित्रपट निर्माते दिग्दर्शक आनंद एल राय ! अनेक दर्जेदार चित्रपटाचा सिनेमॅटिक अनुभव त्यांनी कित्येक वर्ष प्रेक्षकांना दिला. आउट ऑफ बॉक्स जाऊन निर्मिती आणि दिग्दर्शन करणाऱ्या या दिग्गज व्यक्तीचा आज वाढदिवस आहे. आनंद एल राय यंदा त्यांचा 52 वा  वाढदिवस साजरा करत असताना अथक पने नवनवीन चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करण्यात व्यस्त आहेत. आयुष्यात कलेवर आणि स्वतःच्या कामावर त्यांनी प्रेम केलं आहे. 
 
आनंद एल राय यांच्या" कलर यलो प्रॉडक्शनसाठी " गेलं वर्ष आणि हे वर्ष तितकच खास राहील आहे आणि या मागचं कारण देखील कमाल आहे. एका हून एक अश्या अनेक दर्जेदार नव्या प्रोजेक्ट्स वर त्यांच काम सुरू आहे आणि हा आनंददायी प्रवास सुरू आहे. प्रादेशिक चित्रपटात त्यांनी मोठी झेप घेतली आणि आत्मपॅम्फलेट या चित्रपटाला समीक्षकांनी प्रशंसित केलं मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना मोहित केले. आनंद एल राय यांनी हिंदी सोबत मराठी चित्रपटाच्या निर्मितीत पाऊल ठेवलं आहे आणि  झिम्मा 2 चा लगाम देखील घेतला आहे. जो सुपरहिट मराठी चित्रपट झिम्माचा बहुप्रतिक्षित सिक्वेल आहे.
 
कलेच्या प्रेमाबद्दल बोलताना आनंद एल राय म्हणातात "कथाकथन ही आपल्या सर्वांना बांधून ठेवणारी भाषा आहे. एखादी सीमा ओलांडून आणि मन मोहून टाकणारी आहे. माझ्या वाढदिवशी मी प्रेक्षकांच्या अतूट प्रेमासाठी तुमच्या प्रेमाने मी नव्या कथा करत राहण्याच वचन देतो." 
 
इतकचं नाही तर आता प्रेक्षक "
 तेरे इश्क में " या नव्या सिनेमा साठी उत्सुक आहेत. सुपरस्टार धनुष आणि आनंद एल राय यांच्या नव्या सिनेमाच्या घोषणेने हा उत्साह अधिक वाढला आहे. कथाकथनासाठी राय यांचा दूरदर्शी दृष्टीकोन नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. राय हे प्रेक्षकांना नेहमीच मंत्रमुग्ध करून सोडतात. राय हे फिर आयी हसीन दिलरुबा या चित्रपटाचा सिक्वेल देखील करणार आहेत. 
 
आनंद एल राय नेहमीच जगभरातील सिनेफिल्सच्या हृदयावर आणि मनावर अधिराज्य गाजवून जातात.