रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 जून 2023 (22:07 IST)

वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी दिल्या राज ठाकरेंना मनातलं स्वप्न पूर्ण होण्याच्या शुभेच्छा

ajit pawar
विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या बिनधास्त शैलीसाठी ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या याच हटके शैलीत पुन्हा एकदा पत्रकारांना उत्तर दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर अजित पवारानी हे उत्तर दिलं आहे.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून मनसे कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर जमतात. यंदाही राज ठाकरेंचा वाढदिवस जल्लोषात साजरा होत आहे. अजित पवारांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला
 
त्यावर उत्तर देनाता अजित पवार म्हणाले, सकाळी फोन केला. राज ठाकरेंचा फोन उचलला गेला नाही म्हणून त्यांच्या पीएचा नंबर होता. त्याला फोन केला. त्याने फोन उचलला आणि सांगितले की राज ठाकरे लोकांना भेटताहेत, पण देतो फोन. त्याने फोन दिला. मी म्हणालो जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र म्हणून आम्ही बोललो. तुमच्या मनात जे काही स्वप्न आहे ते साकार व्हावं अशा शुभेच्छा मी राज ठाकरेंना दिल्या असे अजित पवार यांनी सांगितले.
Edited By- Ratnadeep Ranshoor