रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 जून 2023 (21:58 IST)

शिवाजी विद्यापीठाचे 2023-24 या नवीन शैक्षणिक वर्षातील काही अभ्यासक्रमांना 3 जुलैपासून सुरूवात

शिवाजी विद्यापीठाचे 2023-24 या नवीन शैक्षणिक वर्षातील काही अभ्यासक्रमांना 3 जुलैपासून सुरूवात होणार आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या दोन्ही सत्रांच्या तारखा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. तरी विद्यापीठ अधिविभाग, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत पदवी व पदव्युत्तर नवीन शैक्षणिक वर्षातील प्रथ व व्दितीय सत्राची सुरूवात आणि शेवटच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, समाजशास्त्रे पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर विद्यापीठ अधिविभाग, महाविद्यालय, कला व ललित कला, वाणिज्य व्यवस्थापन अभ्यासक्रम, व्यवस्थापन पदव्युत्तर, समाजकार्य पदवी, पदव्युत्तर, शिक्षणशास्त्र पदवी, पदव्युत्तर, विधी प्रथम वर्ष विधी पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रम, अभियांत्रिकी व्दितीय वर्ष, तृतीय वर्ष, अंतिम वर्ष, पदव्युत्तर प्रथम, पदव्युत्तर व्दितीय वर्ष, फार्मसी पदवी प्रथम, व्दितीय, फार्मसी पदव्युत्तर प्रथम व व्दितीय आदी अभ्यासक्रमांच्या समावेश आहे. या सत्र सुरूवात आणि समाप्तीचे वेळापत्रक अधिविभाग, महाविद्यलयांना ईमेलव्दारे कळवण्यात आले आहे. तरी महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक पाहावयाचे आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor