शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मे 2023 (13:05 IST)

फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेता आकाश पाटील लग्नबंधनात अडकला

actor Akash Patil got married
social media
स्टार प्रवाहची मालिका फुलाला सुगंध मातीचा खूप प्रसिद्ध झाली. ही मालिका टेलिव्हिजन वर खूप गाजली होती. त्यातील सर्व कलाकार प्रेक्षकांच्या घरात आणि मनात पोहोचले.त्यातील एका अभिनेत्याचे नुकतेच लग्न पार पडले, त्याच्या लग्नाला त्याचे संपूर्ण ऑन स्क्रीन कुटुंब उपस्थित  होते. 
 
फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेता आकाश पाटील नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. आकाश ने या मालिकेत तुषारची म्हणजे शुभमच्या लहान भावाची भूमिका साकारली होती. त्यात त्याने इमेलीच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. त्याने आता रिअल लाईफ मध्ये इमेलीशी वैवाहिक गाठ जोडली आहे. 
 
आकाशच्या लग्नाला त्याचा रील लाईफ परिवार म्हणजे फुलाला सुगंध मातीचाचे सर्व कलाकार आले होते. अभिनेत्री समृद्धी केळकर देखील आपल्या दिराच्या लग्नाला आली होती. 
 
अभिनेत्री ऐश्वर्या शेटे देखील आपल्या दिराच्या लग्नाला उपस्थित होती. ऐश्वर्याने सोनालीची भूमिका साकारली होती.  
 
या वेळी सर्वानी नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मालिकेच्या संपूर्ण टीमला आणि कलाकारांना एकत्र पाहून चाहत्यांना आनंद होत आहे. 
 
Edited by - Priya Dixit