PLANET MARATHI : SOPPA NASAT KAHI - एक स्त्री राहणार दोन पुरुषांसोबत ?

SOPPA NASAT KAHI
Last Updated: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (20:50 IST)
काळ बदलतो तसे समाजाचे आचारविचार बदलतात. जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीसोबत सामाजिक नियमात बदल होत जातात. काही वर्षांपूर्वी 'लिव्ह इन रिलेशनशिप' ही नवीन संकल्पना समोर आली होती. परदेशात या संकल्पनेचा सहजासहजी स्वीकार झाला. परंतु आपल्या समाजात ही संकल्पना पचनी पडायला थोडा अवधी लागला. नात्याचा असाच एक नवीन प्रकार पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचलित आहे. तो म्हणजे 'पॉलीअमॉरी'. एक स्त्री आणि एक पुरुष ही आपल्यासाठी जोडप्याची व्याख्या. परंतु 'पॉलीअमॉरी' संकल्पनेत दोन पुरुष आणि एक स्त्री किंवा दोन स्त्रिया आणि एक पुरुष असे एकत्र राहतात. सामंजस्याने स्वीकारलेल्या या नात्याला आपला समाज किती मान्य करेल, हा एक चर्चेचा विषय असला तरी भारतीयांसाठी हा प्रकार काही नवीन नाही. कारण भारतीय महाकाव्यांपैकी एक असलेल्या महाभारतात द्रौपदीला पाच नवरे होते. त्यामुळे ही संकल्पना फार आधीपासूनच आपल्याकडे प्रचलित आहे. याच 'पॉलीअमॉरी' संकल्पनेवर आधारित एक नवीकोरी वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी' आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. मयुरेश जोशी दिग्दर्शित 'सोप्पं नसतं काही' या वेबसिरीजमध्ये मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर आणि अभिजीत खांडकेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

नुकताच 'सोप्पं नसतं काही' चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून यात मृण्मयीच्या आयुष्यात शशांक आणि अभिजीत असे दोन पुरुष दिसत आहेत. त्यांच्या आयुष्यात नेमके काय होते? आता मृण्मयी या दोघांबरोबर राहणार का? की आणखी काही पर्याय निवडणार, याची उत्तरे वेबसिरीज पाहिल्यावरच मिळतील.

'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रदर्शित होणाऱ्या 'सोप्पं नसतं काही' या वेबसिरीजबद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' या वेबसिरीजचा विषय आजपर्यंत मराठीत कधीही हाताळण्यात आलेला नाही. मुळात आपले मराठी प्रेक्षक खूपच चोखंदळ आहेत. नवनवीन विषयांचा ते नेहमीच स्वीकार करतात. त्यामुळे हा एक वेगळा विषयीही ते नक्कीच स्वीकारतील. आपली
कला, संस्कृती, साहित्य यांना आधुनिकतेची जोड देत ती सातासमुद्रापार पोहोचवण्याचा प्रयत्न 'प्लॅनेट मराठी ओटीटी', अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनीच्या माध्यमातून केला जाणार आहे. या माध्यमातून जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, नाविन्यपूर्ण व दर्जेदार कंटेन्ट देणे, ही आमची जबाबदारी आहे. 'सोप्पं नसतं काही' हा त्याचाच एक भाग आहे. या वेबसिरीजला प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देतील याची खात्री आहे.''


'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर ३१ ऑगस्टपासून 'सोप्पं नसतं काही' ही वेबसिरीज प्रेक्षकांना अतिशय अल्प दरात पाहता येईल.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Boney Kapoor Fraud Case:निर्माता बोनी कपूर झाले सायबर ...

Boney Kapoor Fraud Case:निर्माता बोनी कपूर झाले सायबर फ्रॉडचे शिकार, बँक खात्यातून मोठी रक्कम चोरी
प्रसिद्ध निर्माता आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांच्यासोबत सायबर ...

या १० दक्षिण भारतीय चित्रपटांचा बॉलिवूडमध्ये येणार रिमेक; ...

या १० दक्षिण भारतीय चित्रपटांचा बॉलिवूडमध्ये येणार रिमेक; बघा, कोणते आहेत हे चित्रपट
एकीकडे हिंदी आणि दक्षिण भारतीय भाषांबाबत यापूर्वी बरेच वाद झाले आहेत, तर दुसरीकडे दक्षिण ...

क्रूझ प्रकरणात आर्यन खानला क्लीन चीट; चार्जशीटमध्ये उल्लेखच ...

क्रूझ प्रकरणात आर्यन खानला क्लीन चीट; चार्जशीटमध्ये उल्लेखच नाही
सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यनसाठी आनंदाची बातमी आहे. वास्तविक, शाहरुख खानचा ...

सौंदर्य बाळगणारा केरळचा वर्कला बीच

सौंदर्य बाळगणारा केरळचा वर्कला बीच
जगात असे फार कमी देश आहेत जिथे हजारो किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे, भारत त्यापैकी एक आहे. ...

आर्यन खानला एनसीबीकडून क्लिनचिट

आर्यन खानला एनसीबीकडून क्लिनचिट
कार्डिलिया क्रुजवर अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एनसीबीने शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन ...