मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जून 2019 (14:37 IST)

रितेशचा चाहत्यांना 'स्माईल प्लीज'चा सल्ला

मागील काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या 'विक्रम फडणीस दिग्दर्शित 'स्माईल प्लीज' या चित्रपटाचे पहिले पोस्टर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने नुकतेच त्याच्या सोशल मीडियावर लाँच केले आहे. या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत आहे. आयुष्यातील हसण्याचे क्षण अधोरेखित करणारे हे पोस्टर निश्चितच डोळ्यांना सुखावणारे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात, परंतु त्याकडे सकारात्मकतेने बघून, जीवनाची पुनर्मांडणी करण्यास शिकवणारा 'स्माईल प्लीज' हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित 'स्माईल प्लीज' हा चित्रपट प्रेक्षकांनाही जगण्याची नवीन उमेद देऊन, चेहऱ्यावर नक्कीच स्माईल आणेल.