शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (09:55 IST)

प्रशांत दामले यांच्या आईचे निधन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (ABMNP) अध्यक्ष व मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना मातृशोक झाला आहे. प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले (Vijaya Damle) यांचे काल रात्री वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रशांत दामले (Prashant Damle mother Passed Away) यांच्या आंबोली अंधेरी येथील राहत्या घरामध्ये त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. या बातमीमुळे मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
प्रशांत दामले (Prashant Damle) हे नाटकाच्या दौऱ्यानिमित्त पुण्यामध्ये होते. आज सायंकाळी साडे तीन वाजण्याच्या सुमारास आंबोली स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार  येणार आहेत. चित्रपट विश्वातील अनेकांनी प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहली आहे.