बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 14 मार्च 2020 (09:49 IST)

उत्सुकता वाढविणारे ‘सरसेनापती हंबीरराव’ चे पोस्टर प्रदर्शित

लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. तिथीनुसार साजर्‍या केल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मुहुर्तावर ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.  
 
‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमध्ये पिळदार शरीरयष्टी आणि रांगडा पेहराव यासोबतच हातात दुधारी तलवार (असिका) घेऊन उभे असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते अभेद्य असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगाकडे पाहताना दिसत आहेत. मावळत्या सूर्याच्या साक्षीने उभे असलेले ते एखाद्या कणखर कड्याप्रमाणे भासतात.  ‘जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा’ असे लिहिलेल्या या पोस्टरमध्ये दिसणारा अभिनेता नक्की कोण आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.