गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 9 मार्च 2020 (12:22 IST)

स्वप्नीलला चाहत्यांचे प्रश्न

नुकतच स्वप्नील जोशी याने एका कार्यक्रमाला हजेरी लावली असता, तिथे त्याच्या काही चाहत्यांनी त्याला भेटून "समांतर"या वेबसिरिजचा टिझर पाहून ते किती उत्सुक आहेत स्वप्नीलला एका नवीन माध्यमात पहायला हे सांगितले. या भेटी दरम्यान त्याच्या चाहत्यांनी त्याच्या पहिल्यावहिल्या एम एक्स ओरिजिनलची निर्मिती असलेली "समांतर" वेबसिरीजमध्ये 'सुदर्शन चक्रपाणी याला तो का शोधत आहे? आणि सुदर्शन चक्रपाणी हा कोण आहे? हे प्रश्न विचारत त्यांनी त्याच्या वेबसिरीज पदार्पणासाठी शुभेच्छा दिल्या.

त्याच बरोबर त्यांना टिझर आवडल्याचे ही त्यांनी स्वप्नीलला सांगत "सुदर्शन चक्रपाणी कोण आहे ?" असा प्रश्न असेलला बोर्ड हातात धरून त्यांनी स्वप्नील सोबत फोटो सुद्धा काढला. हा फोटो सध्या सोशल मीडिया वर वायरल होत आहे.