शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 डिसेंबर 2017 (17:19 IST)

रिंकू आता मकरंद मानेच्या 'कागर' मधून भेटीला

रिंकू राजगुरू आता राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मकरंद मानेच्या 'कागर' ! मधून भेटीला येत आहे. या नव्या चित्रपटाचं नाव आणि त्याचा फाँट नुकताच सोशल मीडियात लाँच करण्यात आला. या नावाच्या केलेल्या डिझाईनवरून चित्रपटाविषयी काही अंदाज व्यक्त करता येतात. 'कागर' ह्या नावाचा फाँट हा बघताक्षणी अॅग्रेसिव्ह वाटतो. सध्या जगात या विचारसरणीचा जास्त प्रभाव वाहतो आहे. तसेच या डिझाईनमध्ये उधळलेला गुलाल हा कुतूहलतेचा प्रश्न आहे.
 
या चित्रपटात रिंकूसह बाकी कलाकार कोण आहेत, याचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे. 'उदाहरणार्थ निर्मित'चे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.  
 
चित्रपटाच्या नावाच्या डिझाईनविषयी दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले, 'जेव्हा चित्रपटाचे नाव आपण जाहीर करतो, तेव्हा बऱ्याच गोष्टीची काळजी घ्यावी लागते. चित्रपटातून आपण नेमकं काय मांडू पाहतोय याची ती पहिली झलक असते. 'कागर'चा फाँट डिझाईन करणारे चैतन्य संत यांना कथा ऐकवल्यानंतर त्यांनी गोष्टीच्या महत्वाच्या घटकांचा विचार करून, खूप विचारपूर्वक आणि कथेचा सार याचं मिश्रण करून आकर्षण निर्माण करणारा 'कागर'चा फाँट तयार केला आहे.