बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

कवी गुरु ठाकूर यांनी प्रथमच केले 'जराशी जराशी' गाण्याचे लाँच

नवा जोश, नवा उत्साह आणि प्रदर्शनाची नवी तारीख घेऊन 'देवा' हा आगामी मराठी सिनेमा या  वर्षाअखेरीस प्रेक्षकांना जगण्याची नवी उमेद घेऊन येत आहे. आपल्या चाहत्यांना वेगवेगळ्या मार्गाने सुखद धक्के देणाऱ्या या सिनेमाचे नुकतेच 'जराशी जराशी' हे गाणे, कवी गुरु ठाकूर यांच्या हस्ते लाँच करण्यात आले.
 
मुरली नलप्पा यांनी दिग्दर्शित केलेल्या 'देवा' सिनेमातील या गाण्यामध्ये मनमौजी व्यक्तिमत्वाची झलक पाहायला मिळते. हे गाणे स्वतः गुरु ठाकूर यांनी लिहिले आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अंकुश चौधरी यांच्यावर आधारित असलेले हे गाणे आयुष्याला नवी दिशा देणारे आणि जगण्याला नवसंजीवनी देणारे ठरत आहे.
 
इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित 'देवा' सिनेमासाठी आघाडीचे संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी अजून एक वेगळे सुमधूर गाणे रसिकांसमोर आणले आहे. शिवाय या गाण्याला हर्षवर्धन वावरे याचा गोड आवाज लाभला असल्याकारणामुळे, हे गाणे अधिकच बहरले आहे.
येत्या २२ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील इतर गाण्यांप्रमाणे 'जराशी जराशी' हे गाणेदेखील भरपूर गाजत असून, या सिनेमातील एकामोगामाग एक हिट गाणे लोकांसमोर येत आहे. 'देवा' सिनेमातील ही सर्व गाणी प्रेक्षकांना केवळ अतरंगी किवा सतरंगीच नव्हे तर, सुमधुर संगीताची सफरदेखील घडवून आणते.