मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 10 जुलै 2022 (13:32 IST)

रितेश देशमुखची सलमान साठी पोस्ट ,आता… वेडेपणा सुरु होणार

अभिनेता रितेश देशमुख वेड या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्यांची पत्नी जेनेलिया प्रमुख भूमिकेत आहे. एका मोठ्या ब्रेक नंतर जेनेलिया मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रितेश देशमुख यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. आणि त्याने या पोस्टद्वारे अभिनेता सलमानखान यांचे आभार मानले आहे.
 
आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे .
अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो. 
 
अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’ . माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी #लईभारी साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक #वेड केलंय. 
थॅक्यु भाऊ. लव यू. 
 
तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे वेड पूर्ण झाला आहे .
 
आणि आता… वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच...
 
मी तब्बल 20 वर्ष केमेऱ्याच्या समोर असून प्रथमच केमेऱ्याच्या मागे राहून पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करीत आहे. तुमच्या सर्वांचा शुभेच्छा आणि आशीर्वाद असू द्या.