शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (13:01 IST)

सैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये

'परश्या आर्ची आली....' अशी साद घालणाऱ्या लंगड्या प्रदीपची भूमिका जगभर गाजवणारा तानाजी गालगुंडे, लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. आगामी 'माझा अगडबम' या सिनेमाद्वारे तो पुन्हा एकदा झळकणार आहे. तृप्ती भोईर आणि सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात तो 'वजने' नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. दहा वर्षापूर्वी तुफान प्रसिद्धी मिळवणाऱ्या 'अगडबम' सिनेमाचा दमदार सिक्वेल असलेल्या 'माझा अगडबम' सिनेमात तो नाजुकाच्या मित्राची भूमिका करताना दिसून येणार आहे. 'पेन इंडिया कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत या सिनेमाचे लिखाण आणि दिग्दर्शन तृप्ती भोईरचेच आहे. शिवाय टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांसोबत तिने निर्मितीफळीतदेखील आपला सहभाग दर्शवला आहे. तसेच रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात तानाजी 'नाजूका' बरोबर काय धम्माल करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.