गुरूवार, 7 डिसेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (16:01 IST)

सनी देओलने दिल्या 'आत्मपॅम्फ्लेट'ला शुभेच्छा

Aatma Pamphlet
सध्या प्रेक्षकांमध्ये एकाच चित्रपटाविषयी चर्चा आहे, तो म्हणजे  'आत्मपॅम्फ्लेट'. मुळात या चित्रपटाचे नावच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे. त्यामुळे परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटासाठी प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही उत्सुक आहेत आणि याला बॉलिवूडचे कलाकारही अपवाद नाहीत. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल यांनीही सोशल मीडियावरून आपला लहानपणीचा फोटो शेअर करत 'आत्मपॅम्फ्लेट'ला शुभेच्छा दिल्या आहेत. गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या डार्क कॉमेडी चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ६ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट'चे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय, कनुप्रिया ए. अय्यर मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज निर्माते आहेत.
 
सनी देओल यांनी शेअर केलेल्या स्टेटसमध्ये त्यांनी त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, 'बचपन की यादें हमेशा ही मन को लुभाती हैं ! और ऐसी ही यादों से जुडा 'आत्मपॅम्फ्लेट' लेकर आ रहा है आशिष, असे म्हणत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. यावरूनच बॅालिवूडलाही 'आत्मपॅम्फ्लेट'ची भुरळ पडल्याचे कळतेय.