गुरूवार, 28 सप्टेंबर 2023
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश चतुर्थी 2023
Written By

गणेश चतुर्थी शुभेच्छा Ganesh chaturthi wishes in Marathi

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ 
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
रम्य ते रूप, सगुण साकार मनी दाटे भाव 
पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहीवर 
बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा 
 
गणेश चतुर्थी शुभेच्छा
बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती 
नसानसात भरली स्फुर्ती 
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
 
आपल्यामनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
 
श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली 
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली 
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
 
सकाळ हसरी असावी 
बाप्पाची मूर्ती समोर दिसावी 
मुखी असावे बाप्पाचे नाव 
सोपे होईल सर्व काम
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
 
मोरया मोरया मी बाळ तान्हे 
तुझीच सेवा करू काय जाणे 
अन्याय माझे कोट्यानुकोटी 
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक 
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी 
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा