रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (17:33 IST)

Big Boss Marathi Season 5 : सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सिझन 5 च्या पर्वातील महाविजेता

suraj chavhan Big boss Marathi 5
Photo- Instagram
बिग बॉस मराठी सिझन 5 च्या पर्वातील महाविजेता म्हणून बारामतीच्या सुरज चव्हाण याची निवड झाली आहे. रविवारी रात्री झालेल्या ग्रँड फिनालेत रितेश देशमुख यांनी सूरजला महाविजेता घोषित केले. त्याच्यावर बक्षिसांची खैरात झाली. 

बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व 28 जुलै पासून सुरु झाले असून यंदा 70 दिवसांतच या पर्वाचा महाविजेता जाहीर करण्यात आला. 

बिगबॉस हा शो 100 दिवसांचा असतो. या मध्ये यंदा 16 स्पर्धक बिगबॉसच्या घरात होते. शेवटी 16 स्पर्धकांपैकी फक्त सहा स्पर्धक शिल्लक राहिले. सर्वाना स्पर्धा देत अखेर पाचव्या पर्वाला आपला महाविजेता मिळाला. 

या शो ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. स्पर्धेतून जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, निकी तांबोळी आणि धनंजय पवार यांनी स्पर्धेतून माघार घेतली. अंकिता प्रभू वालावलकर,धनंजय पवार, जान्हवी किल्लेकर अभिजित सावंत, निक्की तांबोळी आणि सुरज चव्हाण हे सहा प्रतिस्पर्धी ग्रॅन्ड फिनाले पर्यंत पोहोचले.

त्या पैकी अभिजित सावंत आणि सुरज चव्हाण यांनी टॉप 2 मध्ये प्रवेश केला आणि घराचे दिवे घालवून मंचावर प्रवेश केला. अखेर रितेश देशमुख यांनी सुरज चव्हाणला बिग बॉस मराठी पाचवे पर्वाचे महाविजेते घोषित केले. 
Edited by - Priya Dixit