बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 28 सप्टेंबर 2024 (13:31 IST)

बिगबॉस मराठी मध्ये राखी सावंतची जोरदार एंट्री!

कलर्स मराठीवर सध्या बिगबॉस मराठी सीजन 5 प्रचंड गाजत आहे. बिगबॉस मराठी सीजन 5 चे फिनाले 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कोण होणार विजेता किंवा विजेती हे त्या दिवशी ठरणार आहे.
 
आता बिगबॉसच्या घरात ट्विस्ट आला आहे. बिगबॉसच्या घरात राखी सावंतची जोरदार एंट्री झाली आहे. तिने आपल्या एन्ट्रीने प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सुरु केले आहे. बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एंट्री होणार, तिच्या स्टाईलने ठणाणा करणार.
बिगबॉसच्या घरात अनेक नाती पाहायला मिळाली. आई-मुलाचं नातं, बाप-लेकीचं नातं, बहिणी- बहिणींचे नाते. आता या घरात राखी सावंत आल्यामुळे निकी तांबोळी आणि राखी सावंतचे नवे नाते पाहायला मिळणार आहे. बिगबॉस हिंदी मध्ये या दोघींची चांगलीच वाजली होती. आता त्या पुन्हा बिगबॉस मराठी मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करायला एकत्र येणार आहे. आता बिगबॉसच्या घरात पुढे काय घडणार हे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. 
Edited by - Priya Dixit