बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जुलै 2023 (12:25 IST)

स्वानंदी टिकेकर : अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा साखरपुडा झाला, या कलाकाराला करते डेट

Photo- Instagram
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हि नेहमी सोशल मीडियावर एक्टीव्ह असते. तिने सोशलमिडीयावरून तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिने सोबत आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा म्हणजे तिच्या प्रियकर आणि गायक आशिष कुलकर्णीचा फोटो शेअर केला आहे. स्वानंदी ने आमचं ठरलं असं म्हणत फोटो शेअर केला आहे.स्वानंदी आणि आशिष हे दोघे रिलेशन मध्ये आहे. त्यांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा साखरपुडा झाला असून स्वानंदी ने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहे. ते लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. 
 
स्वानंदीचे आई -वडील अभिनेता उदय टिकेकर आणि आई आरती अंकलीकर टिकेकर या गायिका आहे. अभिनेत्री स्वानंदीने दिल दोस्ती दुनियादारी पासून पदार्पण केले. तर आशिष कुलकर्णी हा गायक आहे. त्याने इंडियन आयडॉल सीजन 12 मध्ये परफॉर्मन्स दिले होते. स्वानंदी आणि आशिषवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 
 
Edited by - Priya Dixit