1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 8 जुलै 2019 (11:03 IST)

'दहा बाय दहा' च्या टीमने प्रेक्षकांसोबत साजरा केला २५ वा प्रयोग

ten by ten marathi natak
मध्यमवर्गीय मानसिकता आणि विचारांना छेद देऊन चौकटीबाहेर येण्याचा संदेश देणा-या 'दहा बाय दहा' या विनोदी नाटकाचा नुकताच बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात २५ वा प्रयोग सादर झाला. मुंबईतील एन भरपाऊसातही बोरिवलीकरांनी रात्रीच्या प्रयोगाला उपस्थिती लावत, 'दहा बाय दहा' च्या कलाकारांचे मनोबळ वाढवले. उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या या प्रयोगाअंती स्वत: विजय पाटकर यांनी प्रेक्षकांना रंगभूमीवर बोलावून घेत, त्यांच्याहस्ते रौप्य प्रयोगाचा केक कापत आनंद साजरा केला.  यादरम्यान, पहिल्यांदाच प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचा रंगमंच कलाकार आणि प्रेक्षकांच्या भाऊगर्दीमुळे आणखीनच बहरला.
स्वरूप रिक्रीएशन अँड मीडिया प्रायवेट लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित 'दहा बाय दहा' हे नाटक अनिकेत पाटील यांनी दिग्दर्शित केलं असून, यामध्ये विजय पाटकरांसोबत प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे आणि विदीशा म्हसकर ह्यांचा धुडगूसदेखील पहायला मिळतो. या नाटकाचं लेखन संजय जामखंडी आणि वैभव सानप यांनी केलं असून, हे नाटक वारंवार पाहिले तरी कंटाळा येणार नाही असे आहे.