बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2019 (15:17 IST)

आयुष्य खुप सुंदर आहे...

जन्म दिनांकाच्या दिवशीच
मृत्यू दिनांक ठरलेला असतो
मधला काळ कसा जगायचा
ज्याचा त्यानी ठरवायचा असतो
 
इतरांवर टीका करत जगायचं
का जीवनाचा आनंद घेत जगायचं
हे आपलं आपण बघायचं
 
सोबत येतानाच
दुःख किती भोगायचं
सुख किती द्यायचं
सार ठरलेलं असतं
 
माणूस विनाकारण: विचार करत बसतो
असं कसं झालं?
आणि तसं कसं झालं ?
 
तुमच्या अवती भवतीचे पात्रं  सुद्धा
किती चांगले , किती वाईट 
कोण किती शिकणार ,
कोण कसं निघणार ?
 
लग्न होणार का नाही
झालं तर टिकणार का नाही
हे सर्व
"आयुष्य" नावाच्या नाटकातले सिन असतात
आपण फक्त आपला रोल करायचा
बस्स !
 
विधात्याने एकदा तुमची स्क्रिप्ट लिहिली की लिहिली 
त्यात आपण बदल करू शकत नाही
हे नीट समजून घ्या 
आणि आपलं आयुष्य मस्त पैकी जगा
 
जग बदलण्याच्या भानगडीत न पडता
आयुष्य "जगण्याच्या" भानगडीत पडा
पुढचा माणूस असाच का वागतो,
तसाच का बोलतो,
अशा फालतू प्रश्नां वर विचार करू नका 
तो त्याचा रोल आहे, त्याला दिलेले डायलॉग वेगळे आहेत 
त्याचा रोल त्याला करू द्या
तुमचा रोल तुम्ही करा !
"कुणालाही कमी लेखू नका"
 
आयुष्य खुप सुंदर आहे,
नेहमी हसतमुख आणि आनंदी रहा.