बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जून 2019 (10:48 IST)

'भूलभुलैया'च्या सिक्वेलमध्ये कार्तिक

दहा वर्षांपूर्वी आलेला 'भूलभुलैया' या चित्रपटाचा लवकरच सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 'भूलभुलैया'च्या सिक्वेलमध्ये कार्तिक अक्षय कुमारची जागा घेणार असल्याचं म्हटलं जातं आहे. याआधी या भूमिकेसाठी विकी कौशल, राजकुमार राव, आयुषमान खुराणा या अभिनेत्यांची नावदेखील चर्चेत होती. सगळेच सध्याचे आघाडीचे अभिनेते आहेत. पण त्यात कार्तिकनं बाजी मारल्याचं कळतं आहे.
 
सध्या 'लव आज कल'च्या सिक्वेलचं शुटींगदेखील सुरु आहे..या सिक्वेलमध्ये कार्तिक मुख्य भूमिका साकारतो आहे. त्यामुळे सध्या कार्तिककडे सिक्वेल्सची रांग लागली आहे असं म्हणायला काही हरकत नाही.