रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 18 सप्टेंबर 2022 (14:00 IST)

सैराट’ चित्रपटातील “या” प्रसिद्ध अभिनेत्याला अटक होण्याची शक्यता

अहमदनगर : जिल्ह्यात एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणामध्ये सैराट चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता प्रिन्स अर्थात सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिघांना अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय क्षिरसागर (रा. नाशिक), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे (दोघेही राहणार संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
 
मंत्रालयामध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ५ लाख रूपयांची संशयितांकडून मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी नेवासा तालुक्यामधील महेश वाघडकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सुरज पवार याला देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
अटकेतील एका आरोपीने चौकशीदरम्यान दिलेल्या माहीतीनुसार, या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये अभिनेता सुरज पवार याचा देखील सहभाग आहे. या प्रकरणी महेश वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
2016 मध्ये आलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट(sairat) हा सिनेमा प्रचंड गाजला. या मराठी सिनेमाची भारताबाहेरही चर्चा झाली. या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत अनेक रेकॉर्ड मोडले. या सिनेमाने अनेकांना प्रचंड यश मिळवून दिले.