रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (08:24 IST)

परीच्या मालिकेबाबत निर्मात्यांनी केली ही मोठी घोषणा

majhi tujhi resham gath
छोट्या पडद्यावरील मालिकांचा विशेषतः झी मराठीवरील मालिकांचा एक विशिष्ट असा प्रेक्षकवर्ग असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या मालिकांमधील विषय आणि त्याचे दर्जेदार सादरीकरण. यामुळेच झी मराठीवरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळत असते. आणि म्हणूनच सातत्याने नवनवीन मालिका छोट्या पडद्यावर येत असतात. नवीन मालिका आल्या की जुन्या मालिकांना निरोप देणे ओघाने आलेच. ‘झी मराठी’वरील अशीच एक मालिका आता निरोप घेणार असल्याचे सांगण्यात आले. ही मालिका दुसरी तुसरी कुणी नसून अतिशय लोकप्रिय आणि गोड अशा परीची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड आग्रहास्तव अखेर ही मालिका बंद न करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. मात्र, या मालिकेत थोडासा बदल झाला आहे. ही मालिका आता प्रेक्षकांना दररोज सायंकाळी साडेसहा वाजता पहायला मिळणार आहे.