शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (09:08 IST)

चिंचि चेटकिणीच्या भूमिकेतून वैभव मांगलेंची एक्झिट

vaibhav mangle
‘अलबत्या गलबत्या’या प्रसिध्द बालनाट्यातून चिंचि चेटकिणीची भूमिका साकारणारे अभिनेते वैभव मांगले यांनी या नाटकातून एक्झिट घेतली आहे. याबबात त्यांनी फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. मी चिंचि चेटकीणीचं काम सोडलं आहे. आता‘ती मी नाहीच’ अशा आशयाची पोस्ट मांगले यांनी शेअर केली आहे. आता वैभव मांगले यांच्याऐवजी अभिनेता निलेश गोपनारायण ‘चिंचि चेटकिणी’ची भूमिका साकारणार आहेत. वैभव मांगले यांनी या नाटकाचा निरोप घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, निर्माते राहुल भंडारे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले वैभव मांगले?
प्रिय रसिक प्रेक्षक आणि बालमित्रांनो मैत्रिणींनो मी चिंचि चेटकीणीच काम सोडलं आहे . तरी जाहिरातीतला फोटो माझा आहे असे वाटून कदाचित माझी चेटकीण पाहायला याल आणि भ्रमनिरास होईल.


तर सांगायचा मुद्दा हा आहे कि “ती मी नव्हेच !!”अशी पोस्ट शेअर करत त्यांनी निलेश गोपनारायण आणि स्वत:चा चिंचि चेटकिणीच्या भूमिकेतील फोटो शेअर केले आहेत.