बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (14:54 IST)

'झोंबिवली'च्या शूटिंग दरम्यान सेटवर अशाप्रकारे घेतली जात आहे काळजी

‘दि शो मस्ट गो ऑन पण प्रथम सुरक्षिततेचा विचार केला पाहिजे’. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती, महत्त्वाची काळजी घेऊन हॉरर कॉमेडी जॉनर असलेला ‘झोंबिवली’ या मराठी सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाच्या चित्रिकरणाला उत्साहाने सुरुवात केली आहे. 
 
‘झोंबिवली’ या सिनेमाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला आणि सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक सर्व खबरदारींसह सिनेमाचे शूट देखील सुरू झाले. गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमांतील नाविन्य, अनोख्या कथा आणि वेगवेगळ्या विषयांवर आधारित सिनेमांची होणारी निर्मिती पाहता मराठी सिनेमांनी अनेकांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांनीही त्या सर्व सिनेमांना खूप प्रेम दिले आहे आणि पाठिंबा दर्शविला आहे. ‘झोंबिवली’ सिनेमाचे पहिले ऑफिशिअल पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र त्याचीच चर्चा झाली होती. प्रेक्षकांनी या दोन्ही गोष्टींना प्रचंड प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सिनेमाप्रती उत्सुकता दर्शवली. हा सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी कारणीभूत ठरला कारण हा पहिला मराठी हॉरर कॉमेडी सिनेमा आहे ज्यात झोंबिज दिसणार आहेत.
झोंबींचे उत्कृष्ट व्हिज्युअल, बॅकग्राऊंड म्युझिक यामुळे मोशन पोस्टरला एक वेगळा इफेक्ट मिळाला होता आणि त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता जास्त प्रमाणात वाढली. तसेच या सिनेमाची जबरदस्त स्टारकास्ट आणि प्रतिभावान दिग्दर्शक यांची सोबत देखील या सिनेमाला लाभली आहे.
 
अनेक लोकांना उत्सुकता असेल की सध्याच्या या कठीण परिस्थितीमध्ये शूटिंग कशा पद्धतीने होत असेल. पण निर्मात्यांनी संपूर्ण टीमच्या सुरक्षिततेसाठी PPE किट्स, मास्क, ग्लोव्हस आदी सर्व गोष्टींची सोय केली आहे व त्याचा वापर करूनच शूटिंगची सुरुवात केली आहे. त्याचबरोबर प्रॉडक्शन हाऊसने 'कोविड ऑफिसर' (हेअल्थ केअर एक्स्पर्ट)ची सुद्धा सोय केली आहे जो टीम सोबत असणार आहे आणि संपूर्ण टीम नियमांचे पालन करते आहे की नाही याची खबरदारी घेणार आहे. सेट वरील हे खास फुटेज बघितल्यावर तुम्हांला ही लक्षात येईल की कशा पद्धतीने सर्वांची सुरक्षा व काळजी घेऊन शूटिंग होत आहे.
सारेगम प्रस्तुत 'झोंबिवली' चित्रपटाची निर्मिती Yoodlee Films यांनी केली आहे. तर सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २०२१ ला प्रदर्शित होणार आहे.