शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (16:34 IST)

अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ स्तरावरच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून राज्यात वाद सुरू होता. UGC या केंद्रीय शिक्षण संघटनेने अंतीम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील, असा निर्णय घेऊन त्यासंदर्भात गाईडलाईन्स देखील दिल्या होत्या. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत परीक्षा घ्याव्याच लागतील असा निर्णय न्यायालयानं दिला. 
 
आता राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली असून ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करू’, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच, निकालाचा सविस्तर अभ्यास करूनच पुढील कायदेशीर निर्णय घेतला जाईल, असं देखील ते म्हणाले.