सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (12:00 IST)

आपण जर का रात्री काम करीत आहात, तर या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी

आजच्या काळात बहुराष्ट्रीय (मल्टिनॅशनल)कंपन्यांमध्ये दिवस आणि रात्रीचे अंतर नाहीसे झाले आहेत. लोकं फक्त दिवसातच नव्हे तर रात्री देखील काम करीत आहे. रात्री काम केल्यामुळे आपल्या आरोग्याकडे देखील लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. या दरम्यान, लहान-सहनं  गोष्टींची काळजी घेतल्याने रात्रपाळीमध्ये देखील निरोगी राहू शकतो. चला तर मग या गोष्टींबद्दल जाणून घेऊ या...
 
रात्रीच्या वेळी काम करताना खाण्या-पिण्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. यावेळी बऱ्याचदा आपल्याला कॉफी पिणे आणि चॉकलेट खावेसे वाटते, परंतु या गोष्टींपासून लांबच राहावं. आहारात वेग वेगळे व्हिटॅमिन, खनिजे, प्रथिनं या वर जोर द्यावे जेणेकरून आपली चयापचय(मेटाबॉलिझम)च्या प्रक्रिया सुरळीत आणि आरोग्यवर्धक असावी.
 
रात्रीच्या वेळी पचनाची क्रिया मंदावते म्हणून या काळात जड जेवण घेणे टाळावे. रात्र पाळी करणाऱ्याची जेवण्याची योग्य वेळ संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंतची आहे. त्यानंतर रात्र पाळी सुरू होते. निरोगी आहारासाठीचे अनेक पर्याय आहेत ज्यांना अवलंबणे चांगले आहे जसे की उकडलेली अंडी, फळांचा रस, कमी साय असलेल्या दह्यासह फळाचे तुकडे, फळांसह शेंगदाणे लोणी इत्यादी.
 
रात्री काम करताना पाण्याची गरज सहसा कमी असते. तरीही पाणी पिण्याचे महत्त्व जाणून घ्या. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरात ओलावा टिकून राहतो आणि झोप पण येणार नाही.
    
रात्रपाळीत काम करणारे सकाळी घरी गेल्यावर झोपतात. असं करणं टाळावं. झोपण्यापूर्वी न्याहारी करा. यामुळे आपण निरोगी राहता.