शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (09:52 IST)

जेजुरीच्या खंडोबाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे

क्रेंद सरकारकडून परवानगी असली तरी राज्यातील मंदिरं अजून उघडलेली नाहीत अशात राज्यातील भाविकांकडून खंडोबा मंदिर लवकर सुरु करा अशी मोठया प्रमाणात मागणी होत आहे.
 
करोनाच्या पार्श्वभूमीवर खंडोबाचे मंदिर 18 मार्चपासून बंद असल्याने जेजुरीची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. व्यावसायिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे तातडीने खंडोबा मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्याची मागणी विश्वस्त मंडळानी केली आहे.
 
राज्यात हळू-हळू सगळं सुरु होत असताना मंदिरचं बंद का? आता असा सवाल भाविकांकडून करण्यात येत आहे. राज्यात शेकडो मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांना देवाचे दर्शन होत नसून तेथील मंदिरांवर अनेक लोकांची उपजीविका अवलंबून असून यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.