सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2017 (10:31 IST)

तुझ्यात जीव रंगाला चे चित्रीकरण थांबले

तुझ्यात जीव रंगाला या मालिकेला स्थानिक राजकारणाचा फटका बसलाय. गेल्या दीड वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील वसगडेमध्ये या मालिकेचं चित्रीकरण अखंडीत सुरु होतं. मात्र, वसगडे ग्रामपंचायतीनं कोणताही विचार न करता तडकाफडकी या मालीकेचं चित्रकरण बंद करण्याचे आदेश दिलेत.

ग्रामपंचायतीनं दिलेल्या नोटीसमध्ये सोबो फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं सर्व अटीचा भंग केल्याचं म्हटलयं. त्याचबरोबर मालिकेच्या चित्रीकरणामुळं स्थानिकांना त्रास होत असल्याचा उल्लेख केलाय. मात्र, हे ग्रामपंचायत निवडणुकींनंतरच का घडलं? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.