शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 एप्रिल 2023 (14:31 IST)

प्यार हुआ… इकरार हुआ, वीणा जगतापची पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. वीणा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते मात्र नुकतंच वीणाच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
 
वीणा जगतापने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात वीणाने तिचा एक सुंदरसा फोटो पोस्ट केला आहे. ती यात साडी नेसलेली दिसत आहे तर त्याबरोबर तिने गजरा, बांगड्या, ठूशी असा पारंपारिक लूक केला आहे. विशेष म्हणजे वीणाच्या या फोटोत तिच्या भांगेत कुंकू भरलेलं दिसत आहे. त्याहून विशेष म्हणजे कॅप्शन ज्यात तिने ‘प्यार हुआ,,,,इकरार हुआ’ असे लिहिले आहे. सोबत दोन हार्ट इमोजीही शेअर केले आहेत.