Jayant Sawarkar passed away : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन
Jayant Sawarkar passed away : मराठी चित्रपट, नाटक , टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं .ते काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाची बातमी त्यांचा मुलाने कौस्तुभने दिली. त्यांना अण्णा म्हणून हाक मारायचे. त्यांनी सुहास शिरवाळकर यांच्या कादंबिरीवर आधारित वेबसिरीज मध्ये एका ज्योतिषाची भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी पुलं देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली पुस्तकावर आधारित शीर्षक नाटकात साकारलेली अंतू बर्वाची भूमिका अजरामर झाली.
त्यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षांपासून अभिनयात पदार्पण केले. त्यांनी अपराध मीच केला गोळे मास्तर, अपूर्णांक ब्रम्हे,अलीबाबा चाळीस चोर खुदाबक्ष,अल्लादीन जादूचा दिवा हुजऱ्या, एकच प्याला तळीराम, सूर्यास्त, सूर्याची पिल्ले सारख्या मराठी नाटकात त्यांनी काम केलं. ते काही दिवसांपूर्वी आई कुठे काय करते या मालिकेत दिसले होते.
त्यांनी आपल्या भूमिकेमुळे मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केले.आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित किंग लिअर या नाटकात मास्टर दत्ताराम यांच्यासह जयंत सावरकर यांना काम कऱण्याची संधी मिळाली. हे नाटक फार चाललं नाही मात्र जयंत सावरकर यांनी केलेली विदुषकाची भूमिका चांगलीच गाजली.त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर 25 जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Edited by - Priya Dixit