1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मे 2020 (18:01 IST)

युट्युबर अमेय वाघ !

Coffee
मराठमोळा अभिनेता अमेय वाघचा स्वॅग नेहमीच हटके असतो ! रंगभूमी, वेबसिरीज, मालिका आणि चित्रपट अश्या चारही क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या अमेयला आपण आरजे झालेलं पाहिले आहे, मात्र आता तो चक्क युट्युबर म्हणून लोकांसमोर येणार आहे ! लॉकडाऊनच्या काळात घरकोंबडा होऊन बसलेल्या प्रत्येकांसाठी अमेय युट्युबमार्फत भेटायला येणार आहे. ज्यात क्षितिज पटवर्धनचे लिखाण फोडणी देण्याचे काम करणार आहे. आपल्या सोशल अकाऊंटवरून अमेयने याची अधिकृत घोषणा केली आहे.
 
लॉकडाऊनला अमेयचे समर्थन असून, घरात रहा सुरक्षित रहा असे आवाहन तो सर्व प्रेक्षकांना करतो. ह्या काळात अमेय घरात स्वस्थ बसून आहे. मात्र, सोशलसाईटवर तो सक्रिय आहे. तो शेअर करत असलेले त्याचे क्वारंटाईन टाईम किस्से लोकांचे भरघोस मनोरंजन करणारे आहेत. 
 
आपल्या व्हिडियोद्वारे तो दैनंदिन जीवनातले किस्से त्याच्या हटके स्टाईलद्वारे मांडत असतो. तरुणवर्गामध्ये अमेयची क्रेझ असून, त्याचे हे सारे मजेदार किस्से ऐकण्यासाठी अमेयचे चाहते नेहमी त्याच्या अकाऊंटचे अपडेट चेक करत असतात. मात्र, आता या सर्वांसाठी अमेयने खास युट्युब चॅनल ओपन केले आहे. अमेयच्या विनोदाची स्टाईल जरा हटकेच आहे! त्याच्या सेन्स आॅफ ह्युमरचे लाखो चाहते आहेत, त्यामुळे अमेयचे होस्टिंग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तर मग तुम्ही उत्सुक आहात ना, युट्युबर अमेयला बघायला