गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|

इंग्लडविरुद्धची लढत भारतासाठी 'जिंका किंवा मरा'

वेस्टइंडिजविरुद्ध झालेल्या पराभवामुळे रविवारी इंग्लडविरुद्ध होणारा सामना भारतासाठी 'जिंका किंवा मरा' परिस्थितीचा असणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास उपात्यंफेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळू शकते.

वेस्टइंडिजविरुद्ध पराभवामुळे उपात्यंफेरी गाठण्याची भारताची वाटचाल कठीण झाली आहे. सन 2007 च्या विश्वकरंडक स्पर्धेतही भारताची अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्या परिस्थिती बाहेर येत भारताचे विश्वकरंडक पटकविला होता.

बांगलादेश आणि आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध खेळल्यानंतर वेस्टइंडिजसारख्या मजबूत संघापुढे भारताची आघाडीची फळी कोसळली होती. यापुढील सामनेही इंग्लड आणि आफ्रिकेसारख्या संघाविरुद्ध असल्याने भारताची वाटचाल कठीण असणार आहे.