बुधवार, 28 सप्टेंबर 2022
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|

भारतीय मुलींचा आज उपात्यंफेरीचा सामना

महिलांच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत अपराजित राहिलेल्या न्यूझीलंड संघाला रोखून अंतिम फेरीत पोहचण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे. गुरुवारी होणार्‍या उपात्यंफेरीच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.

इंग्लडकडून पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय महिला संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेला नमवून उपात्यंफेरीत धडक मारली. कर्णधार झुलन गोस्वामीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अपराजित राहिलेल्या न्यूझीलंडसमोर आव्हान उभे करणार आहे.

भारतीय संघाची सलामी जोडी पुनम राऊत आणि अंजूम चोपडा यांना चांगली सुरवात करण्यास अपयश आले आहे. परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी दबावातही चांगली कामगिरी करु शकलेले नाही. अपवाद फक्त झुलन गोस्वामीचा आहे. यामुळे अपराजित राहिलेल्या न्यूझीलंड संघाचा पराभव करुन भारत अंतिम फेरी गाठण्याचे आव्हान भारतीय महिलांना पेलावे लागणार आहे.