धोनीच्या अकादमीत १०० खेळाडूंना मोफत प्रवेश
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नागपूर येथे भारतातील पहिली निवासी क्रिकेट अकादमी स्थापन केली आहे. यात विदर्भातील (नागपूर वगळता) १०० खेळाडूंना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे. यासाठी २५ व २६ आॅगस्ट रोजी येथील बालाजी स्पोर्टस अकादमीवर नि:शुल्क निवड चाचणी होत आहे. खेळाडूंना अत्याधुनिक बॉलिंग मशिन्स व इतर क्रीडा उपकरणाद्वारे बीसीसीआयच्या तज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात महिंद्रसिंग धोनी हे या क्रिकेट अकादमीचे औपचारिक उद्घाटन करणार आहे.