मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 15 सप्टेंबर 2018 (09:46 IST)

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा,आजपासून सुरुवात

सहा देशांचा सहभाग असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ शनिवार अर्थात आजपासून बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली आहे. गेल्या काही वर्षांत बागंलादेशने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०१६ मध्ये मायभूमीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तसेच २०१२मध्येसुद्धा त्यांनी मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत मजल मारली होती. बागंलादेशची फलंदाजी अनुभवी तमिम इक्बाल आणि शकिब-अल-हसन यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून आहे.
 
दुसरीकडे श्रीलंकेला गेल्या दोन वर्षांत भारताकडून तिन्ही प्रकारात सपशेल शरणागती पत्करावी लागली. अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा, थिसारा परेरा आणि लसिथ मलिंगावर श्रीलंकेची भिस्त आहे. त्याशिवाय युवा खेळाडू अकिला धनंजया, दसून शनाका आणि कसुन रजिथा यांच्याकडे ही सर्वाच्या नजरा आहेत. 
 
सामन्याची वेळ : सायं. ५ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३.